Monday, 28 July 2008

"कुटुंब"

कुटुंब नक्की काय असत
तिन शब्दांचा खेळ असतो
तरीही, नात्यांचा मेळ असतो

कुटुंब नक्की काय असत
चार भिंतीमधील बंदिस्त जीवन असत
तरीही सलोख्याच नात  असत

कुटुंब नक्की काय असत
एकमेकांवर अंकुश असलेल जीवन असत
तरीही, एकमेकांवर प्रेम  असत

कुटुंब नक्की काय असत
एकमेकांवर रुसन्याच ठिकाण  असत
तरीही, सर्वात शेवटीतेच  असत

कुटुंब नक्की काय असत
एक प्रकारची गजबलेली जत्रा असते
तरीही, खेळन्यात मज्जा असते

कुटुंब नक्की काय असत
जे अनाथाला नक्की माहित नसतं
तरीही, त्यालाते हवहवस वाटणार असत.